माजी नगरसेवक देवराम घुंडरे पाटील यांचे निधन....
गौतम पाटोळे.
आळंदी :- संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सहभागी, खेड तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष,१९७५ चे माजी नगरसेवक,शिक्षण महर्षी,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवराम बाबुराव घुंडरे पाटील यांचे ( दि. १ ) वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले.त्यांनी १९७७ साली कस्तुरबा आदिवासी ज्ञानसेवा मंडळाची स्थापना करून कस्तुरबा सेवा मंडळ वाचनालय व ग्रंथालय, कस्तुरबा बालक मंदिर, राजीव गांधी इंग्लिश मिडीयम स्कूल या संस्थांची उभारणी केली. ते या सर्व संस्थांचे संस्थापक अध्यक्ष होते. तसेच आळंदी नगरपालिका आणि ज्ञानेश्वर विद्यालय शिक्षक सोसायटी च्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. वाचनालय, ग्रंथालयाचे माध्यमातून विविध सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रम,राष्ट्रीय सण,उत्सव,राष्ट्रीय नेते,मान्यवरांचे जयंती पुण्यतिथी दिनविशेष साजरे करण्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला. आळंदी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांचे पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,तीन मुली,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. ते सामाजिक कार्यकर्ते राजेश घुंडरे पाटील,आळंदी नगरपरिषद कर्मचारी महेशनाना घुंडरे पाटील यांचे वडील होत.