फोर्टी प्लस गायन स्पर्धेची आॕडिशन डोंबिवली येथे संपन्न..
वयाची चाळीशी पुढच्या गायक गायिकेंना गाण्याची संधी मिळावी या उद्देशाने लेखक दिग्दर्शक असलेले प्राध्यापक दिपक जाधव आणि सुप्रसिद्ध गायिका रेखा निकुंभ यांनी डोंबिवली पूर्वेच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्युटच्या एस.एन.डि.टी. महिला महाविद्यालयात रविवारी हौशी गायक गायिकेंसाठी आॕडिशनचे आयोजन केले होते.. याकामी एस.एन.डि.टी. डोंबिवलीचे प्राचार्य डाॕक्टर अरूण अहिरराव.. कार्यक्रमाचे सल्लागार अॕडव्होकेट प्रदीप बावसकर.. संयोजक सुनील बनसोडे साईली बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले..
रोजीरोटी आणि इतर काही कारणांमुळे फक्त मनात.. किचन पुरतं अथवा बाथरूम पुरतं मर्यादित राहिलेलं हौशी कलाकारांच्या मनातलं गाणं लोकांसमोर यावं हा उद्देश ठेऊनच आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केल्याची माहिती प्राध्यापक दिपक जाधव आणि सौ. रेखा निकुंभ यांनी दिली.. गाणं कसं गावं या बद्दल डाॕक्टर अरूण अहिराव यांनी प्रत्यक्ष गाणं गाऊन मार्गदर्शन केलं. अॕडव्होकेट प्रदीप बावस्कर आणि सुनील बनसोडे यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या गायन स्पर्धेच्या आॕडिशन मध्ये प्रदीप पवार. दिनेश बिवलकर. पुंडलिक गोडे. रविकांत जाधव. रमेश गभाले. विनय डांगे. राजेंद्र गायकवाड. शरद ताजणे. शोभा मराठे. अॕडव्होकेट किरण कांबळे. महेंद्र अहिरे. सुनिता बावसकर. संतोष मुरूडकर. सुरेंद्र पवार. राज कुबल. दिलीप म्हात्रे इत्यादी अनेक हौशी गायक गायिकेंनी आपली गाणी सादर केली. महाराष्ट्रा बाहेर राहणाऱ्या तथा वयोवृद्ध असलेल्या मुंबई पासून दूर असलेल्या इतर जिल्ह्यांतील काही स्पर्धकांनी त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ पाठवले.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून झाली. या प्रसंगी सौ. रेखा निकुंभ यांनी श्री गणपती स्तवन गायलं. उत्तरोत्तर सदाबहार गाणी गात स्पर्धकांनी आॕडिशन गाजवली.. प्राध्यापक दिपक जाधव सरांनी खुमासदार सूत्रसंचालन करून नवोदित हौशी गायक गायिकेंच्या मनावरचा ताण कमी केला. या कार्यक्रमाची व्हिडिओ रेकाॕर्डिंग उमेश परब यांनी केली तर स्टिल फोटो बी.एस.जाधव यांनी काढले.. लवकरच गायन स्पर्धेची फायनल डोंबिवली येथे घेणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्राध्यापक दिपक जाधव आणि रेखा निकुंभ यांनी दिली.