विजेच्या धक्क्याने चार बैल ठार मालकाला मिळाले नुकसान भरपाई
केळवाडी येथे विजेच्या धक्क्याने चार बैल ठार झाले होते यांची बातमी शासना पर्यंत गेल्यावर मालकाला मिळाले नुकसान भरपाई.
गेल्या आठवड्यात मुरबाड तालुक्यातील केळवाडी अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकरी गोविंद तुका खाकर यांचे चार बैल विजेच्या धक्क्याने ठार झाले होते यांची बातमी शासना परत गेल्यावर मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी कलेक्टर यांना माहिती दिली यामुळे शेतकरी गोविंद तुका खाकर यांना एक लाख आठाविस हजार रुपये चा चेक देण्यात आले यामुळे शेतकरी खुश झाला पण चार निष्पाप जीव गेल्याचे दुःख दिसून येत आहे या बातमीचा पाठ पुरावा पत्रकार वेल्फेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांनी केले होते.
राजेश भांगे (मुरबाड)