महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटनेकडून मोफत आरोग्य शिबीर संपन्न
टिटवाळा :- टिटवाळा मांडा पश्चिमेतील महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार संघटनेकडून नोंदणीकृत इमारत व बांधकाम कामगार कुटुंबियाकरिता मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
यावेळी सदरील शिबिराचा लाभ अनेक कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला. सदरील शिबीरामध्ये 50 पेक्षा अधिक आरोग्य चाचण्यांचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शिबिराचे आयोजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष गौतम शामराव बरडे यांनी दिली. तर कार्यक्रमास ठाणे जिल्हा प्रमुख सुधीर शर्मा,कार्याध्यक्ष प्रविण तायडे,सचिव माया बरडे इत्यादी पदाधिकाऱ्यांसह संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सदरील संस्थेच्या माध्यमातून असंघटित कामगारांसाठी विविध प्रकारच्या लोकोपयोग,सामाजिक सेवा राबविण्यात येतात.