टिटवाळ्यात पोलीस कुटुंबासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
राजू टपाल.
टिटवाळा :- कल्याण तालुका पोलीस स्टेशन व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय अधिकारी /कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी शनिवारी सकाळी 10 :30 ते दुपारी 3 या वेळात कल्याण तालुका पोलीस स्टेशन ,टिटवाळा (प) येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात मोफत हृदयरोग तपासणी,इसीजी,बीपी,शुगर,अस्थिरोग तपासणी, नेत्र तपासणी,नाडी परीक्षण,
दंत तपासणी,फिजिओथेरपी,रक्त तपासणी तसेच अवयव दानाबद्दल जनजागृती करण्यात आली .
या शिबिराचा अंदाजे 150 शासकीय अधिकारी /कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाने लाभ घेतला
या शिबिरास एम्स हॉस्पिटल ,निरामय हॉस्पिटल,अलकेम लाईफ कंपनी,इलाइट डेंटल क्लिनिक, क्लिनिटेक लॅबोरेटरी लिमिटेड,आय ऑप्टिक्स, रि लाईव्ह फिजीओथेरेपी व द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन यांचे विशेष सहकार्य लाभले
शिबीर यशस्वी करण्यास सुरेश कदम,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कल्याण तालुका पोलीस स्टेशन व त्यांच्या सर्व टीमचे तसेच डॉ प्रमोद नांदगावकर,सह व्यवस्थापकीय संचालक, रेड स्वस्तिक सोसायटी व त्यांच्या संपूर्ण टीमचे सहकार्य लाभले.