कोंढापुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
शिरूर:-ग्रामपंचायत कार्यालय कोंढापुरी,बेलस्टार मायक्रो फायनान्स लिमिटेड,हॅन्ड इन हॅन्ड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.१२ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आले आहे. ग्रामपंचायत कार्यालयाजवळील मारूती मंदीर सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबिर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडणार असून सर्वरोग आरोग्य तपासणी,व मोफत औषधोपचार,सर्दी,ताप,खोकला,बी पी तपासणी,उंची व वजन तपासणी, पोटाचे विकार, महिला तसेच मुलींचे आजार तपासणी या शिबिरात केली जाणार असून मार्गदर्शनही या शिबिरात केले जाणार आहे. जुने मेडिकल रिपोर्ट,आधारकार्ड व मोबाईल नंबर सोबत ठेवावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.