• Total Visitor ( 133532 )

मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य तसेच नेत्रतपासणी शिबीर संपन्न

Raju tapal February 05, 2025 36

मोफत शस्त्रक्रिया व आरोग्य तसेच नेत्रतपासणी शिबीर संपन्न,

कल्याण/शिवसेना बेतुरकरपाडा आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील नागरिकांन साठी मोफत शस्त्रक्रिया महाआरोग्य तपासणी तसेच आरोग्य व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन शिवसेना उपनेत्या विजया पोटे व माजी नगरसेवक अरविंद पोटे यांच्या वतीने तसेच आरोग्यम धनसंपदा फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था व तेरणा रिसर्च सेंटर हाँस्पिटल नेरूळ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते,
जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले, शिबीरा मध्ये नेत्र तपासणी, दात तपासणी, ईसीजी तपासणी, दम लागणे,पोटाचे आजार, आदी आजाराची मोफत तपासणी करण्यात आली, व औषधे गोळ्या मोफत देण्यात आल्या,जर आजार आढल्यास मोफत शस्त्रक्रिया केली जाईल ,तसेच डाक विभागाच्या विविध योजना असून त्याची माहिती हि देण्यात आली,
आरोग्य शिबीरासाठी केदार गावडे, सुरज खानविलकर, वैभव अधिकारी, अक्षय सकपाल, राजेश कांबळे, यश भोईर, ओमकार झुटे,अरुण चौधरी, प्रविण जाधव,रमेश मोरे,यांनी सहकार्य केले,
तसेच संध्याकाळी महिलांन साठी हळदिकुंकु कायैक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, महिलांना हळदिकुंकु करुन सौभाग्याचे लेंण वाण भेट देण्यात आली, 
शिवसेना उपनेत्या व जिजाऊ महिला नागरि सहकारी पतसंस्थेच्या संस्थापका व अधयक्षा विजया पोटे,मंदाकिनी गरुड, विधा चौधरी, कल्पना तांबे,इंदुमती जाधव, दिपा लोहार, पुजा मोहिते, मेघा जाधव,दीपाली वाळेकर,अंकिता भालेराव, तन्वी गनै,करुना बेनके, मोहिनी गावकर,अनिता माळी,कल्पना महाजन यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,
 

 

Share This

titwala-news

Advertisement