aगणेशवाडीतील 500 मीटर रस्ता स्वखर्चाने केला खडीकरण
माजी नगरसेवक संतोष तरे यांनी घेतली दखल
टिटवाळ्यातील गणेशवाडी परिसरात जाणारा मुख्य रस्त्याची अवस्था पावसामुळे अत्यंत दयनिय झालेली होती. याबाबत स्थानिक रहिवाश्यां नी माजी नगरसेवक संतोष तरे यांच्याकडे रस्त्याबाबत गाऱ्हाणे मांडल्यावर त्यांनी लागलीच स्व खर्चातून 20 मोठ्या गाड्या आयशर खडी टाकून सदरील रस्त्याचे खडीकरण करून दिले. त्यामुळे ऐन नवरात्र,दिवाळी दसऱ्याच्या सणासाठी तात्पुरत्या का होईना नागरिकांना चालण्यापूरता रस्ता बनवून दिल्या बद्दल नागरिकांनी संतोष तरे यांचे आभार मानले.