• Total Visitor ( 84993 )

हुंबरठ-साकेडीफाटा येथे गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात

Raju tapal November 06, 2024 61

हुंबरठ-साकेडीफाटा येथे गांजा विक्री करणारा तरुण ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई तर दुचाकी केली जप्त

कणकवली:-मुंबई – गोवा महामार्गावरील हुंबरठ – साकेडी फाटा येथे गांजा विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून ४७ हजार ४०० रुपये किमतीचा १ किलो ५८० ग्रॅम प्लास्टिक पिशवीतील ओलसर गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच त्या तरुणासही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय सुत्रांच्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी रियाज हुसेन बोत्रे (४२, रा. मेहबूबनगर, उंबर्डे, ता. वैभववाडी) याला अटक केली आहे.

जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ तिकीत्चे प्रमाण अधिक प्रमाणावर वाढू लागले आहे. त्यामुळे अंमली पदार्थ विक्री व खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी स्थानिक गन्दा अन्वेषण विभागाचे पथक गस्त घालत होते. यावेळी एक संशयित गांजासदृश पदार्थ विक्री करता हुंबरठ – साकेडी फाटा येथे महामार्ग उड्डाणपुलाखाली येणार असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार किरण गोसावी, ए. ए. गंगावणे, पी. एस. कदम, एस. एस. सावंत आदींनी केली.याप्रकरणी किरण देसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करत आहेत.

हुंबरठ येथे रियाज बोत्रे हा संशयित तरुण गांजासदृश पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने फिरताना आढळला. संशयिताला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्या जवळील प्लास्टिक पिशवीमध्ये सुमारे ४७ हजार ४०० रुपये किंमतीचा १ किलो ५८० ग्रॅम गांजासदृश पदार्थ आढळून आला. तो जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याजवळील ५५ हजार रुपयांची दुचाकी (क्रमांक एमएच ०७ एएन ६९५४) ताब्यात घेण्यात आली. तसेच त्याला कणकवली पोलिस ठाणे येथे आणण्यात आले.
 

Share This

titwala-news

Advertisement