• Total Visitor ( 84814 )

गा़ंजाची शेती ,गांजाची विक्री केल्याच्या कारणावरून चौघांना अटक

Raju Tapal October 26, 2021 44

गा़ंजाची शेती ,गांजाची विक्री केल्याच्या  कारणावरून चौघांना अटक ; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई 

 

मुळशी तालुक्यातील पौड जवळील गवळीवाडा, अंबरवेट परिसरात गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत चौघांना जेरबंद केले.

चेतन मारूती मोहोळ वय -27 रा.कानिफनाथ सोसायटी ,कोथरूड, साहेबा हुल्लाप्पा म्हेत्रे वय -20 रा.कोथरूड, प्रकाश वाघोजी खेडेकर वय -35 , इंदुबाई वाघोजी खेडेकर वय - 65 रा.दोघेही गवळीवाडा , अंबरवेट, पौड अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

त्यांच्याकडून गांजाची २५० झाडे, १८ किलो गांजा, इतर असा एकूण ११ लाख ६३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोहोळ व म्हेत्रे याला कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संशयावरून गांजा विक्री करताना अटक केली होती. त्यांच्याकडून ५८० ग्रॅम गांजा मिळाला होता. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पौड परिसरातील अंबरवेट येथून गांजा आणल्याचे सांगितले.

पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड ,प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने  अंबरवेट येथे जावून प्रकाश खेडेकर यांच्या घरी तहसिलदारांच्या उपस्थितीत घराची झडती घेतली त्यावेळी घरात १८ किलो ९९५ ग्रॅम ओलसर हिरवट काळसर बोंडे, फांद्या पाने मिळाली. या ठिकाणाहून खेडेकर दाम्पत्याला पकडून चौकशी केली. त्यावेळी घराजवळील जागेत गांजाची शेती केली असल्याचे आढळून आले. त्याठिकाणी पोलीसांना २५० तयार गांजाची झाडे आढळून आली. त्या ठिकाणाहून पोलीसांनी १५४ किलो गांजा जप्त केला.

Share This

titwala-news

Advertisement