सिद्धिविनायक महागणपती मंदिर महाराष्ट्रामधील ठाणे जिल्यात कल्याण कसारा रेल्वे मार्गांवर टिटवाळा गावात असलेले गणपतीचे देउळ आहे.
आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निम्मिताने टिटवाळा महागणपती मंदिरात गणेश भक्तांची मांदियाळी दिसून येत होती. ठाणे जिल्यातील कल्याण कसारा मार्गांवर वसलेलं श्री क्षेत्र टिटवाळा हे महागणपती साठी प्रसिद्ध असं तीर्थस्थान आहे.कोरोना महामारी आणि लॉकडाऊन नंतर साधारणपणे दोन वर्षांनी आलेली आजची अंगारकी संकष्टी चतुर्थी आणि वर्षाची एक शेवटची अंगारकी निमितात मुंबई, ठाणे, कल्याण परिसरामधील अनेक गणेश भक्त टिटवाळा येथे महागणपती दर्शनाला अगदी भल्या पहाटे पासून येते असल्याचे चित्र दिसून आले. एरवी मध्य रात्री 12 ला उघडणारे महागणपती मंदिर हे आज पहाटे 4 च्या सुमारास भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे मध्य रात्री आलेल्या भक्तांना बाप्पा च्या दर्शनासाठी पहाटे 4 पर्यंत ताटकळत वाट पाहावी लागली. तरीपण गणेश भक्तांमधील उत्साह हा अखंडपणे जाणवत होता.. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोष देत मंदिर अगदी दुमदुमून गेले होते. पुरुष मंडळी, महिला वर्ग, तरुण मुलं मुली तितक्यात उत्सहात बाप्पा च्या दर्शनासाठी आतुर होताना दिसत होते.
भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासन, पोलीस प्रशासन सज्जपणे उभं तर हार, प्रसाद, फुलांची दुकानें सुद्धा तितक्याच उत्साहाच्या वातावरणात भक्त गणांसाठी आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र दिसून येत होते.
मंदिर पुजारी यांनी मंदिर खुलं करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून भक्तांनी सुद्धा सोशल डिस्टन्स पाळत बाप्पाचे दर्शन घेण्याचं आवाहन भाविकांना केले आहे.