गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करणा-यास पाटस टोलनाका येथे जेरबंद करण्यात आले. वाहनासह ४ लाख ७१ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी पत्रकारांना दिली.
यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाल्यानुसार पाटस पोलीस दुरक्षेत्र येथील सहाय्यक फौजदार सागर चव्हाण पोलीस हवालदार संजय देवकाते, निलेश कदम ,गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जगताप प्रवीण चौधर पाटस टोलनाका येथे थांबले होते.
मारूती स्विफ्ट कार नंबर एम एच १२ ए टी ७८९४ ही कार येताना दिसली. पोलीस पधकाने बॅरिकेट लावून वाहनासह चालक अमित धुल्ला गुडदावत वय २४ रा. शेलारवाडी ता.दौंड यास ताब्यात घेवून गाडीची पाहणी केली असता ७ गावठी हातभट्टी तयार दारूची कॅन्ड मिळून आले.
वाहनासह ४ लाख ७१ हजार ३५० रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.