• Total Visitor ( 84555 )

घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार गजाआड

Raju Tapal December 03, 2021 50

घरफोडी व वाहनचोरी करणारा सराईत गुन्हेगार विमानतळ पोलीसांकडून गजाआड

    

वाहनचोरी आणि घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला पुण्यातील विमानतळ पोलीसांनी अटक केली.

टारझनसिंग चंदासिंग भोंड वय - २२ पाटील इस्टेट झोपडपट्टी शिवाजीनगर पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून आरोपीकडून ६ दुचाक्या व घरफोडीच्या गुन्ह्यातील एकूण २ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

म्हाडा कॉलनीजवळ ही कारवाई करण्यात आली.

आरोपी घरफोडी करण्यासाठी दुचाकीचा वापर करत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आल्याने विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ४ पिंपरी व भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी १ अशा एकूण ६ दुचाक्या चोरल्याचे निष्पन्न.झाले. 

पोलीस उपनिरीक्षक अविनाश शेवाळे, सहाय्यक फौजदार गणेश साळूंखे पोलीस नाईक सचिन जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share This

titwala-news

Advertisement