• Total Visitor ( 133420 )

सोशल मीडियावर Ghibli चा धुमाकूळ; ‘एआय’ चित्रांचा महापूर 

Raju tapal April 01, 2025 37

सोशल मीडियावर Ghibli चा धुमाकूळ; ‘एआय’ चित्रांचा महापूर 

मुंबई :- सध्या जपानी ॲनिमेशन शैलीच्या ‘घिबली’ (Ghibli) तील ‘एआय’ चे सर्व वयोगटातील लोकांना वेड लागले आहे. ओपन-एआय चॅटजीपीटीच्या नवीन अपडेटद्वारे वापरकर्ते त्यांची छायाचित्रे घिबलीद्वारे कॉर्टूनमध्ये कॉन्व्हर्ट करून सोशल मिडीयातील विविध व्यासपीठावरून पोस्ट करत आहेत. यामुळे घिबली (Ghibli) च्या चित्रांचा महापूर आला आहे. ‘एआय’च्या मदतीने घिबली (Ghibli) जगभरातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करत आहे.                     

चॅटजीपीटी प्रो यूजर त्यांच्या चॅट इंटरफेसमध्ये टेक्स्ट किंवा फोटो अपलोड करून काही क्षणांतच घिबली शैलीतील छायाचित्रे मिळवता येतात. ‘एआय’द्वारे त्याचे रूपांतर जपानी ॲनिमेशनच्या क्लासिक घटकांत रूपांतरित केले जाते. त्यामुळे आठवणी या कलाकृतीचे रूप घेतात.

ChatGPT वापरून घिबली स्टाईल इमेजेस कशा बनवायच्या?  

1. OpenAI ChatGPT वेबसाइट किंवा ॲप उघडा  

2. तुमची आवडती इमेज अपलोड करा किंवा ChatGPT ला आवश्यक माहिती देऊन एक नवीन इमेज जनरेट करा  

3. चॅटबॉटला फक्त ‘Ghiblify’ इमेज किंवा ‘Turn this image in the theme of Studio Ghibli style’ असे सांगा  

4. काही सेकंदात तुम्हाला अपेक्षित इमेज मिळेल

 

Share This

titwala-news

Advertisement