चिंचोली मोराची मध्ये होणार भव्य दत्त मठ
शिरूर - शिरूर तालुक्यात चिंचोली मोराची मधील उकिर्डे मळा येथे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळ माध्यमातून दत्त मठ उभारण्यात येत आहे.लवकरच काम चालू होणार आहे.या ठिकाणी मागील काही दिवसा अगोदर दत्तगुरूचे छान मंदिर बांधून दत्त ची मूर्ती बसवण्यात आली आहे.पौरहित्य
पद्मनाभ स्वामी शिष्य सांप्रदाय भारती रघुनाथ स्वामी दुर्गादास नाणेकर यांनी यज्ञ होम करून श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठा केली.सदर ही त्रिगुणी दत्तमूर्ती वीस ते पंचवीस वर्षे जुनी आहे.नवसाला पावणारा दत्त म्हणून त्याची ओळख आहे.
श्री दत्त औदुंबर सेवा मंडळ च्या माध्यमातून भव्य दत्तमठाचे निर्माण होत आहे.या दत्त मठामध्ये भक्तांसाठी राहण्याची सोय,भजन,गुरुचरित्र पारायण,अन्नदान,नामस्मरण सर्व सोय युक्त असणार आहे.
श्री दत्त औदुंबर सेवा मंडळाचे भक्त दादासाहेब उर्फ संतोष दादाभाऊ उकिर्डे यांनी सर्व भक्तांना मठासाठी देणगी देण्याची आवाहन केले आहे. दादासाहेब यांना दत्तगुरु चा आशीर्वाद मिळाला असून त्यांना त्यांच्या गावाच्या राहत्या घरासमोरच दत्तगुरूंचा साक्षात्कार झाला होता.त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ दत्तमठ उभारण्याचे ठरले आहे. लवकरच दत्त मठाचे काम चालू होणार आहे.
असे श्री दत्त औदुंबर सेवा मंडळ माध्यमातून दादासाहेब यांनी सांगितले आहे.