बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !
मराठी पत्रकारितेचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिन आज महापालिकेत संपन्न झाला. महापालिका मुख्यालयात शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या समयी उपस्थित उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके,शिक्षणाधिकारी विजय सरकटे ,माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा. सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.