जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस माहिती व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या समयी उपस्थित माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, उपअभियंता श्याम सोनवणे तसेच इतर कर्मचारी वर्ग यांनी देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले.
तद्नंतर पारनाका, कल्याण (पश्चिम) येथे असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास उपायुक्त संजय जाधव, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यासमयी सौरभ कुळकर्णी, शंभू पंडित, सारंग केळकर , प्रवीण शहाणे , मिलिंद रेडे, संदीप पळणीटकर व इतर नागरिक उपस्थित होते.
डोंबिवली येथील महापालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयाजवळील स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास फ प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंबिवली विभागीय कार्यालयातील इतर कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.