गुढीपाडव्यानिमित्त शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे पंचांगवाचन
-----------------
घरोघरी गुढी उभारून, घरासमोर रांगोळ्या काढून, गोडधोड स्वयंपाक करून ,पंचांगवाचन करून शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे शनिवार दिनांक २/०४/२०२२ रोजी गुढीपाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
गुढीपाडव्यानिमित्त कोंढापुरी येथील मारूती मंदीराशेजारील शिरूर हवेली तालुक्याचे आमदार ऍड. अशोक पवार यांच्या मदतनिधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहात श्री.रामेश्वर ढाकणे यांनी सकाळी ९ वाजता पंचांगवाचन केले. पर्जन्यमान समाधानकारक राहील, अन्नधान्याच्या बाबतीत समृध्दी येईल ,भरभराट होईल असे भाकीत यावेळी वर्तविण्यात आले. यात्राकमिटी निवडण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आली. एकाच ठिकाणी बसून यात्रेची वर्गणी गोळा करण्यापेक्षा घरोघरी जावून यात्रेची वर्गणी गोळा करावी अशी सुचना ग्रामस्थांकडून यावेळी करण्यात आली.
निळूभाऊ महादेव गायकवाड, बापुराव दादासाहेब गायकवाड, दत्तोबा आनंदराव गायकवाड, नामदेव मल्हारराव गायकवाड, शामराव विष्णूजी गायकवाड, बाळासाहेब नारायण रासकर, दौलतराव मल्हारी गायकवाड, वामनराव मल्हारी गायकवाड, बळवंत गेनभाऊ गायकवाड, सर्जेराव धोंडीबा गायकवाड, राजेंद्र विठ्ठलराव गायकवाड, कुंडलिकराव पठारे, ऋषिकेश राजेंद्र गायकवाड, मधुकर जगन्नाथ गायकवाड, प्रकाश हरिभाऊ घाडगे, सुखदेव आनंदराव गोगावले, किसनराव केरूजी गोगावले, अंबर राधुजी गायकवाड, माणिकराव रामचंद्र गायकवाड, दिपक संपतराव गायकवाड,तुकाराम आनंदराव गायकवाड, अंकुशराव चांगदेव गायकवाड, शांताराम काशिनाथ गायकवाड , विलास वसंतराव सांगडे आदींसह ग्रामस्थ पंचांग वाचन कार्यक्रमास उपस्थित होते.
इंद्राने दिलेली कळकाची काठी उपरीचर राजाने जमिनीत रोवली होती. नवीन वर्षाच्या सुरूवातीला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढीपुजन केले जावू लागले. या दिवशी ब्रम्हदेवाने विश्वनिर्मिती केली.
प्रभू श्रीरामचंद्र १४ वर्षाचा वनवास संपवून बलाढ्य रावणाचा, इतर शत्रुंचा पराभव करून या दिवशी अयोध्येत परतले होते. अशी पौराणिक कथा गुढीपाडवा सणाविषयी सांगितली जाते.