रत्नागिरीत रविवारी गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रा
श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या वतीने येत्या रविवारी (दि. ३० मार्च) ग्राममंदिर ते समाजमंदिर गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन केले आहे.
श्री देव भैरी मंदिर ते जयस्तंभ श्री मारुती मंदिर - जयस्तंभ ते श्री पतितपावन मंदिर असा यात्रेचा मार्ग आहे.
रविवारी सकाळी ९ वाजता श्रीदेव भैरी मंदिर आणि मारुती मंदिर सर्कल येथे पारंपरिक वेशभूषेत बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.