गुरांची चोरी करणा-या टोळीला अटक ; इंदापूर पोलीसांची कारवाई
-----------------
शेतक-यांची जनावरे चोरी करणा-या माढा येथील टोळीला इंदापूर पोलीसांनी अटक केली.
अटक करण्यात आलेल्या टोळीकडून ७ गुन्है उघडकीस आणून ६ लाख ४० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
इंदापूर पोलीस ठाण्यांतर्गत मागील तीन ते चार महिन्यांपासून जनावरे चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यानूसार इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टि.वाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.जी.पाटील यांच्या पथकाने आरोपी टोप्या उर्फ पिंट्या आलेकर वय २९ व त्याचे इतर तीन साथीदार सर्वजण रा.माढा जि.सोलापूर या टोळीला शिताफीने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता इंदापूर पोलीस ठाण्यांतर्गत वेगवेगळ्या गावातील शेळ्या, बोकड, जर्शी गाई, म्हशी अशी जनावरे चोरल्याची कबूली दिली. आरोपींकडून अंदाजे ४ लाख रूपये किंमतीची बोलेरो पिक अप , ३५ हजार रूपये किंमतीची एक म्हैस, ९० हजार रूपये किंमतीच्या दोन जर्शी गायी इतर जनावरे विकून आलेले १५ हजार रूपये असा एकूण ६ लाख ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
सहाय्यक फौजदार श्री.तांबे, श्री.काझी, पोलीस हवालदार श्री.वाघ,श्री.शिंदे, पोलीस नाईक श्री.नगरे, श्री.कदम,श्री.कळसाईत, श्री.आटोळे, श्री.गायकवाड पोलीस शिपाई सय्यद, श्री.राखुंडे या पोलीसांनी ही कारवाई केली.