• Total Visitor ( 501194 )
News photo

"गुरू" अमृताचा सागर -प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण 

Raju Tapal publisher April 14, 2026 49

"गुरू" अमृताचा सागर -प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण 



शिक्रापूर:- आपल्याला ज्ञान देणारा,ते ज्ञान आपल्या अंतरंगात रूजविणारा "गुरू " अमृताचा सागर असल्याचे प्रतिपादन प्रवचनकार तृप्तीताई प्रताप चव्हाण यांनी कोंढापुरी येथे केले.

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील श्री सांप्रदायाचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष,सेवानिवृत्त शिक्षक विजयराव विश्वनाथराव गायकवाड,पोलीस खात्यातील अनिलराव विश्वनाथराव गायकवाड यांच्या मातोश्री गं.भा.लिलाबाई विश्वनाथराव गायकवाड यांच्या दशक्रियाविधी निमित्त गायकवाड परिवाराने आयोजित केलेल्या प्रवचनात प्रवचन सांगताना तृप्तीताई चव्हाण बोलत होत्या.

राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,व्यापार,उद्योग,धार्मिक,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था,संघटनांचे पदाधिकारी दशक्रिया विधीस उपस्थित होते.

आई मायेचा सागर आहे असे सांगून तृप्तीताई चव्हाण प्रवचन सांगताना पुढे म्हणाल्या,सागर कधी आटत नाही,सागर कधी लाटा थांबवत नाही.

श्री सांप्रदायाची ओळख सांगताना तृप्तीताई चव्हाण यांनी उपस्थितांना सांगितले,श्री.सांप्रदायामध्ये मार्गदर्शन,प्रवचन,सेवा या सर्व गोष्टी डिजिटल चालतात.आम्ही त्याला हायटेक सांप्रदाय म्हणतो.जर एखाद्याला दान करायचे असेल तर त्याची पावती डिजिटल होते.त्यातला एकही पैसा मधून कोणीच काढू शकत नाही.अध्यात्माचे सखोल ज्ञान देणारी,आम्हा सर्वांना माहीत असणारी,सकाळी ६ ते ७ यावेळेत चालणारी आध्यात्मिक शाळा.ज्यामध्ये सर्वं ग्रंथाचे सार आम्हा लोकांपुढे उघड सोडणारी‌ ती आमची गुरू माऊली,आमचे प्रभुजी‌ ते म्हणजे जगद्गुरु,रामानंदचार्य,नरेंद्राचार्यजी. लाडक्या लेकरांकडून चांगलं कर्म व्हायला पाहिजे,प्रत्येक वेळेस,प्रत्येक व्यक्तीबद्दल आपुलकी असली पाहिजे.त्यासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम चालू असतात.संजीवनी असेल,माधुगरी‌ असेल, महिला मेळावे असतील,इतर मार्गदर्शन असेल अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांतून लेकरांना एकत्रित आणलं जाते.आपण कधी कधी देहासक्त होतो.देहासक्त म्हणजे काय ? असा सवाल उपस्थित श्रोत्यांना करून प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण यांनी प्रवचनात सांगितले,देह आपल्याला नामस्मरण करण्यापासून रोखतो.आपण त्या देहाची काळजी करत राहातो आणि नामस्मरणाला लांब ठेवतो.त्याला देहासक्त म्हणतात. तुम्ही जे. करता तेच तुम्हाला परत येतं.तुम्ही चांगलं कराल तर चांगलंच आपल्याकडे येणार.जर वाईट कराल जेव्हा अंत:काळ येईल तेव्हा मात्र वाईटच होणार आहे.ते बघायला आजूबाजूची लोक नसतात .ते आपलं आपल्यालाच कळतं.असे प्रवचनकार तृप्तीताई चव्हाण यांनी प्रवचनात श्रोत्यांना सांगितले.

श्री.सांप्रदायाचे जिल्हाध्यक्ष विजय बांदल,शिरूर पंचायत समितीचे सदस्य सागर देवकर यांनी कै.गं.भा.लिलाबाई विश्वनाथ गायकवाड यांना उपस्थित सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

   


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement