ह.भ.प.कै. शंकर महाराज लोणे दुःखद निधन
कल्याण तालुक्यातील नडगांव गांवातील जेष्ठ नागरिक ह.भ.प. कै.शंकर महाराज लोणे शुक्रवार दिनांक २४/१/२०२४ रोजी सकाळी ७.३०वाजता दुःख त निधन झाले मृत्यू समयी ८६ वयाचे होते. ह.भ.प.कै. शंकर महाराज लोणे हे वारकरी संप्रदायाचे होते. कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात धार्मिक कार्यक्रमात व सामाजिक कार्यक्रमात हिरारिने भाग असायचा नडगांव गांवात अंखड हरिनाम सप्ताह सुरू केला. ह.भ.प.कै.शंकर महाराज लोणे हे परोपकारी व मन मिळावु, शांत स्वभावचे होते. त्याच्यामागे चार मुलगे व एक मुलगी राजाराम लोणे,ह.भ.प.पंडीत महाराज लोणे, पत्रकार तानाजी लोणे, जयवंत लोणे मुलगी वंदना सुदाम पाटील, चार सुना ,दोन नातसुना नातु,पणतु असा परिवार असुन त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक २/२/२०२५ नाशिक येथे होणार आहे तर उतरकार्य बुधवार दिनांक ५/२/२०२५रोजी राहत्या घरी नडगांव (वरचा पाडा)ता.कल्याण. जिल्हा ठाणे येथे होणार आहेत.