• Total Visitor ( 84696 )

हल्यावेळी परमबीर सिंग यांनी कसाबचा मोबाईल लपवला होता. - रिटायर्ड एसीपी समशेरखान पठाण

Raju Tapal November 25, 2021 48

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी काही संपत नसल्याचे दिसत आहे. त्यांच्यावर रोज नवनवीन आरोप होत आहे. नुकतच त्यांना फरार घोषित केलं होत. त्यानंतर आता त्यांच्यावर मुंबई पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंग यांच्यावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाबचा मोबाईल फोन गायब केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांना शमशेर खान-पठाण यांनी पत्र लिहिले असून त्यात त्यांनी या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.  या पत्रात असे म्हंटले आहे की, डीबी मार्ग पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पीआय माळी यांनी आपल्याला कसाबकडून एक मोबाईल फोन सापडल्याचे सांगितले होते, जो पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. पण ज्या ठिकाणी कसाबला पकडले त्या गिरगाव चौपाटीच्या सिग्नलजवळ परमबीर सिंग आले होते. त्यांनी तो मोबाईल स्वतःकडे ठेवला. तपासी अधिकारी रमेश महाले यांच्याकडे तो मोबाईल तपासकामी द्यायला हवा होता पण त्यांनी तसे काही केले नाही. या मोबाईलवरुन हल्ल्यावेळी कसाबसह अन्य दहशतवादी पाकिस्तानातील आपल्या हॅंडलरशी संवाद साधत होते. त्याफोनद्वारे पाकिस्तानी हँडलर आणि त्यात कोणी भारतीय आहे का, हे कळू समजू शकले असते, त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Share This

titwala-news

Advertisement