• Total Visitor ( 84720 )

हमारा एक ही सपना! निरोगी रहे घर आपणा!!

Raju tapal October 04, 2021 33

हमारा एक ही सपना!

निरोगी रहे घर आपणा!!

रेंजन्सी रहिवाशी मंडळ आयोजित हेल्थ सेमिनार बॉडी अनलेसेस कॅम्प काल उत्साही वातावरणात पार पडला. सदरील कार्यक्रमासाठी टिटवाळ्यातील मंडळींनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आपली उपस्थिती नोंदवली. माजी नगरसेविका उपेक्षाताई  भोईर यांची विशेष प्रमुख उपस्थिती होती.

 त्यांनी जमलेल्या जनसमुदायला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आरोग्य टिकवून ठेवणे आहारात योग्य आहार असला पाहिजे  ही काळाची गरज या प्रकारे मार्गदर्शन करून उपस्थितांची मने जिंकली तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.तुकाराम नेहरकर जागतिक आरोग्य सल्लागर यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले वाढलेले वजन किंवा कमी असलेले वजन यामुळे आपल्याला शारीरिक काय त्रास होतात आणि त्यावर आपण काय केले पाहिजे यावर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले यानंतर आश्रूभा खेडकर यांनी जागतिक आरोग्य सल्लागार यांनी स्वतःचा अनुभव आणि माणसं किती आजाराला सामोरं जातात आणि हॉस्पिटलमध्ये तेवढ्याच प्रमाणात भरती होतात तुम्ही जर आमच्या आरोग्य फॅमिली शी जॉईन झालात तर तुम्ही आजार मुक्त जीवन जगाल अशी मी 100% ग्वाही देतो असे मार्गदर्शन केले. यानंतर विनोद आघाव, शिवाजी गोपाळघरे, कृष्णा बांगर यांनीही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी किशन मुंढे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृष्णा बांगर यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फापाळे यांनी केले कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य संतोष चिंचकर, दिलीप फापाळे, तातेराव फड, कैलास जाधव, संदीप धमापूरकर,निलेश देसाई, हेमंत शेळके,बाबा सानप आदींनी सहकार्य केले.

Share This

titwala-news

Advertisement