हनुमान मंदिर कलशरोहण, मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दरेकरवाडी येथे आयोजन
शिरूर :- शिरूर तालुक्यातील दरेकरवाडी येथे बुधवार दि.२ एप्रिल २०२५ रोजी श्री.हनुमानमंदीर कलशरोहण व मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील महंत गिरिजानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते बुधवार दि.२ एप्रिलला दुपारी १२.३५ वाजता कलशरोहण,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहूल पाचर्णे, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सोपानराव दरेकर, उद्योजक जयसिंग दांगट यांच्या हस्ते दुपारी १.३० वाजता मुख्य सर्व मुर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार असल्याचे दरेकरवाडी येथील ग्रामस्थांनी सांगितले.
सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत ह.भ.प.भागवत महाराज बादाडे बीड यांचे सुश्राव्य कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
प्रधान संकल्प, गणपती पुजन, पुण्याहवाचन, ग्रामदैवत पुजा,ग्रामदेवी मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य वरण, अग्नी स्थापना, प्रधान देवता स्थापना, मंडल स्थापना, मंदीर वास्तु पूजन, देवांची जल यात्रा व मिरवणूक, मुर्तीला संपूर्ण दशविधीस्नान, अभिषेक व देवास जलाधीवास ,होम,नवग्रह,मुख्य देवतांचा होम,वास्तू शांती होम, कलशरोहण, झेंडा लावणे,मुख्य सर्व मुर्तींची प्राणप्रतिष्ठापणा,मंडल देवता होमहवन, बलिदान,पुर्णाहुती, नैवेद्य,आरती, भागवत महाराज बादाडे यांचे कीर्तन, पंचक्रोशीतील भजनी मंडळाचा हरिजागर असे कार्यक्रम दिवसभरात पार पडणार आहेत.
प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ( शिरूर )