शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय ,निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांचे इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फुर्तीने करणार आहोत असे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.
तिरंग्याच्या निर्धारित केलेल्या किंमतीमध्ये प्रत्येक घराने ग्रामपंचायत कार्यालयातून ध्वज खरेदी करावा असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.
प्रत्येक नागरिकाने ध्वज संहितेचे पालन करावे , तिरंगा झेंडा फडकाविताना केशरी रंग वरच्या बाजूने असावा, तिरंगा झेंडा उतरवताना काळजीपूर्वक व सन्मानाने उतरावा, १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत हर घर झेंडा उपक्रमांतर्गत लावण्यात आलेले झेंडे अभियान कालावधीनंतर प्रत्येकाने सन्मानाने व सुरक्षित ठेवावे, अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जावू नये,तो सन्मानाने जतन करून ठेवावा, अर्धा झुकलेला कापलेला झेंडा कुठल्याही परिस्थितीत लावू नये, राष्ट्रध्वजाचा अवमान ,अपमान होणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी असे झेंडा फडकविण्याबाबतचे नियम ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.