श्री दंबाकाली पीठाधीश्वर म्हणून गौरीश गुरुजी यांचा सन्मान.
श्री दंबाकाली मंदिर रानविहीर तालुका शहापूर जिल्हा ठाणे समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीश गुरुजी यांना श्री दमबाकाली पिठाधीश्वर म्हणून मान्यता मिळाली असून त्यांचा नाशिक येथे सन्मान करण्यात आला आहे. विरक्त साधू समाज नाशिक मंडळ, नाशिक दिगंबर आखाडा तथा श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत डॉ.भक्ती चरणदासजी महाराज नाशिक व इतर साधुसंतांच्या उपस्थितीत गौरीश गुरुजी यांना विधी युक्त पद्धतीने श्री दंबा काळी पिठाधीश्वर म्हणून मान्यता दिली आहे. समाजासाठी असलेली तळमळ विशेषतः. आदिवासी लोकांसाठी त्यांची उन्नती व्हावी या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून गौरीश गुरुजी हे सतत प्रयत्नशील असतात.
श्रीदंबा काली मंदिर समितीचे विश्वस्त प्रशांत देशमुख, सचिन रांजणे, ऋतुराज चौधरी, सुनीलजी सोगीर हे देखील कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित होते. गौरीश गुरुजी यांच्या या सन्मानामुळे भक्तजना मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात देखील गौरीश गुरुजी यांच्या हातून असेच चांगले कार्य घडत राहो यासाठी जनसमुदाय त्यांना जोडला जात आहे.