बेकायदा गोवा बनावटीच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
Raju tapal
December 05, 2024
15
बेकायदा गोवा बनावटीच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
इन्सुली एक्ससाइजची कारवाई..
बांदा:-स्कोडा सारख्या महागड्या कारमधून दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोल्हापूर येथील दोघांना राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज सकाळी ८ वाजता जुन्या बांदा-पत्रादेवी मार्गावर पंजाबी ढाब्याच्या परिसरात करण्यात आली. त्यांच्याकडून दीड लाखाच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना पत्रादेवी-बांदा रोड, पंजाबी धाबा येथे वाहनांची तपासणी करत असताना बेकायदा गोवा बनावटीची दारू आढळून आली. याप्रकरणी ऋषिकेश जाधव व शीतल शेटे (दोघे रा. कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून दीड लाखाच्या दारूसह साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक भानुदास खडके, दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चौगुले, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री आदींच्या पथकाकडून करण्यात आली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर करीत आहेत.
Share This