मुक्ता प्रकल्पात सर्परक्षक क्षितिज जाधव यांनी केली सर्प जनजागृती
परिवर्तन महिला संस्था, बालिका भवन, टिटवाळा (महिला आश्रम) म्हणजेच मुक्ता प्रकल्पातील कुटुंबाच्या सर्व युवती आणि महिला वर्गासाठी सर्परक्षक क्षितिज जाधव यांनी सर्प-जनजागृती केली. आश्रमातील मुली व महिला वर्गाला प्रोजेक्टर च्या सहाय्याने पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन व चलचित्र दाखण्यात आले या माध्यमातून सर्प ओळख, श्रध्दा- अंधश्रद्धा, सर्पदंश व उपचार पद्धती, वन्यजीव कायदे व इतर अशी आवश्यक माहिती देण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वनविभागाचे कल्याण वनपाल राजू शिंदे, उद्योजक व टिटवाळा परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भावेश जाधव, परिवर्तन महिला संस्था संचालिका सुरेखाताई शिंदे, वन्यजीव अभ्यासक सुहास पवार, आपत्तीमध्ये काम करणारे स्थानिक जागरूक नागरिक श्रवण गौंड उपस्थित होते.