टिटवाळा येथील साई प्रेरणा पतपेढीच्या शाखेचे उदघाटन,
साई प्रेरणा को आँप क्रेडिट सोसायटि मुंबई या संस्थेची 23 ,वी शाखा टिटवाळा येथे सुरु करण्यात आली असुन मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन शाखेचे उदघाटन साई प्रेरणा पतपेढीचे जेष्ठ संचालक रमेश गाढवे यांच्या हस्ते करण्यात आले,
यासमयी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे,उपाध्यक्ष तुकाराम मोरे,संचालक राजेंद्र डोंगरे,बळीराम थोरात, बंडु ओतुरकर,विजय तांबे, गोपाळ बाळगी,राजाराम चव्हाण, अशोक पवार, बाबुराव डोंगरे,सरव्यवस्थापक बाबाजी घोलप, तसेच टिटवाळा शाखेचे शाखा अधिकारी कुमार कराळे,तसेच टिटवाळा येथील हेमंत परटोले,समीर म्हशीलकर,संजय पोटे,यांच्या सह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते,
साई प्रेरणा पतपेढीच्या उदघाटन समयी श्री सत्य नारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी संस्थापक अध्यक्ष देवीदास डोंगरे यांनी सांगितले की संस्थेची टिटवाळा येथे 23 वी शाखा सुरु होत आहे, प्रत्येकानी सभासद झाले पाहिजे, गोर गरीब नागरिकांना आड आडचणीतुन मागै काढण्यासाठी मदत केली जाईल, छोट्या पासून तर मोठ्या पयैत व्यापारी यांना मदत केली जाते असे सांगितले,