इन्कम टॅक्स ऑफिसर असल्याचे सांगून सोनाराला गंडा
टोकावडे नाक्यावरील सोनाराला एक लाख रुपयांचे सोने घेऊन जाणाऱ्या भामट्याला टोकावडे पोलिसांनी गजाआड केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.
टोकावडे नाक्यावरील रतन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात एक जण सोमवार 20 डिसेंबर रोजी सोने खरेदीसाठी आला होता. मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे असे सांगून एक सोन्याची चैन गळ्यातील गरसोळ दोन अंगठी असा एक लाख रुपयांचा ऐवज घेऊन लंपास झाला होता याबाबत मालक अशोक रतनलाल याला विचारले असता त्यांनी सांगितले की मला यांनी भुरळ घातली होती व दमदाटी करत होता मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे पाठीमागे साहेब लोक येतात मला दुकानाची झडती घ्यायाची आहे असे बोलत होता. या प्रमाणे तो मंगळवारी दुपारी 12 वाजता दुकानात पुन्हा आला इतक्यात अशोक रतनलाल माली यांनी टोकावडे पोलिस यांना फोन करून बोलावून घेतले आणि या भामट्यांला पोलीसांच्या ताब्यात दिले.असून याबाबत अशोक रतनलाल माली यांनी टोकावडे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास टोकावडे पोलिस निरीक्षक संतोष दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय सुनिल संसारे, पोलिस हवालदार नितीन घाग करीत आहेत.