इंदापूरजवळील सरडेवाडी टोलनाक्याजवळ ३२ लाखांचा गुटखा जप्त
पुणे - सोलापूर महामार्गावरील सरडेवाडी टोलनाक्याजवळ इंदापूर पोलीसांनी ३२ लाखांचा गुटखा जप्त केला.
गणेश आबासाहेब चव्हाण वय - २५ रा.शेटफळ ता. मोहोळ जि.सोलापूर, गाडीमालक चंद्रकांत क्षीरसागर रा.बारामती जि.पुणे अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांंची नावे असून २३ डिसेंबरला रात्री एकच्या सुमारास इंदापूर बाह्यवळण महामार्ग महात्मा फुले चौकात इंदापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर , सहाय्यक पोलीस निरीक्षक दाजी देठे, पोलीस नाईक मनोज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल फडणीस या पोलीस पथकाने ही कारवाई केली.
सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने येणारे वाहन तपासणी सुरू असताना न थांबता निघून गेल्याने वाहनाचा पाठलाग करून अवैध गुटखा करण्यात आला.पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.