इंद्रायणी नदीत पाय घसरून पडलेल्या वारक-याला वाचवले
इंद्रायणी नदीत स्नान करत असताना पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना जेष्ठ वारक-याला एन डी आर एफ पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून वाचवले.
रघुनाथ कराडे लय - ६५ रा.इंजेगाव जि.बीड असे वारक-याचे नाव आहे.
जेष्ठ वारकरी कराडे इंद्रायणी घाटावर स्नान करण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते पाय घसरून पाण्यात पडले. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहत जात होते. ही बाब एन डी आर एफ पथकाच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कराडे यांना पाण्याबाहेर काढले. प्राथमिक उपचारानंतर आळंदी पोलीसांनी त्यांना कुटूंबियांच्या स्वाधीन केले. ही माहिती आळंदी पोलीसांनी पत्रकारांना दिली.
जेष्ठ वारक-याचा जीव वाचविल्याने एन डी आर एफ पथकाचे कौतुक केले जात आहे