• Total Visitor ( 428952 )
News photo

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणी प्रशिक्षण परिषदेची असंवेदनशीलता

Raju tapal June 03, 2025 318

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणी प्रशिक्षण परिषदेची असंवेदनशीलता



प्राथमिक शिक्षक समितीचे शिक्षण संचालक यांना निवेदन



अमरावती-महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे द्वारा शिक्षकांचे वरीष्ठ व निवड श्रेणी चे प्रशिक्षण संपूर्ण महाराष्ट्रात 2 जून ते 12 जून या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.त्या करिता रुपये 2000 प्रत्येकी रजीष्ट्रेशन फीस घेण्यात आली आहे.प्रशिक्षणाची वेळ सकाळी 9.30 ते 5.30 म्हणजे एकूण 7 तासाची ही वेळ ठेवण्यात आली आहे.2000 एवढी फीस घेऊनही प्रशिक्षण स्थळी चहा,नाष्टा किंवा भोजनाची कुठलीही व्यवस्था प्रशिक्षण संस्थे द्वारे करण्यात आली नाही.प्रशिक्षण हे 9.30 वाजता सुरू होत असल्याने सर्व शिक्षक शिक्षिका यांना 9.15 वाजता हजर होण्याचे आदेश आहेतअमरावती शहरातील प्रशिक्षण हे ज्ञानमाता आणि हॉलिक्रॉस हायस्कूल येथे आहे बरेच शिक्षक,शिक्षिका बाहेरगावाहून प्रशिक्षण घेण्यास आल्या आहेत,तर बऱ्याच लोकांचे घर हे बरेच दूर आहेत.बरेच प्रशिक्षणार्थी आटो-रिक्षा या साधनांनी प्रशिक्षण स्थळापर्यंत पोहचलेले आहेत.प्रशिक्षणाची वेळ सकाळी 9.15 ची असल्याने बऱ्याच प्रशिक्षणार्थींना स्वतः चा टिफिन आणणे शक्य नाही  आणि तेथे जेवणाची व्यवस्था नसल्याने आणि मधला ब्रेक अर्ध्या तासांचा असल्याने बाहेर जाऊन येणे पण शक्य नाही त्या मुळे प्रशिक्षणाच्या वेळचे नियोजन करतांना प्रशिक्षण संस्थेला ही बाब लक्षात आली नसेल का??किंवा शिक्षकांच्या प्रति एवढी संवेदनहीनता का असावी असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला आहे.साधी चहाची व्यवस्था पण प्रशिक्षण स्थळी केलेली नाही.तसेच प्रत्येक तासिकेनंतर एक लिंक प्रशिक्षणार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते त्यावर ऑनलाइन टेस्ट सोडवायची आहे ती पण लिंक काही धड ओपन होत नाही,बिच्चारे शिक्षक ती लिंक ओपन होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात तोंपर्यंत ऑनलाइन टेस्ट ची वेळ संपलेली असते.त्या नंतर घरी जातांना स्वाध्याय सोडवायला दिले आहेत ते पण दिवसभर थकून घरी गेल्यावर पूर्णनकरून सकाळी सबमिट करायचे आहे.एकंदरीत सगळे नियोजन अत्यंत अमानवीय आहे. एकंदरीत वेतनवाढ मिळणार आहे म्हणून शिक्षकांना जेवढा त्रास देता येईल त्याच्या मजबुरीचा जेवढा फायदा घेता येईल याची पूर्ण व्यवस्था शिक्षक प्रशिक्षण संस्थेने केली आहे असे वाटते.आणि पहिलेच गरीब गाय असणारे शिक्षक हे सर्व निमूटपणे सहन करीत आहेत.

शिक्षकांना जो इमेल आला त्यात ज्ञानमाता शाळेत प्रशिक्षण आहे असे लिहिले होते आणि प्रशिक्षण हॉलिक्रॉस मध्ये होते त्या मुळे नवीन लोकांना प्रशिक्षण स्थळी पोहचण्यास उशीर झाला आणि प्रशिक्षणाच्या नवीन तुघलकी निर्णया प्रमाणे 9.30 नंतर येणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाइन एन्ट्री न झाल्याने त्यांची अनुपस्थिती लागली आणि व त्यांना प्रशिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न झाला.सध्याची गर्मी त्यात शाळेच्या डेक्स बेंचवर शिक्षकांना 7 तास बसवून ठेवणे म्हणजे अमानवीय नाही का? प्रशिक्षणाची वेळ 7 तास ऐवजी 5 तास करावी

शिक्षकांच्या नास्ता ,चहा व जेवणाची आणि पिण्याचे पाणीची व्यवस्था करण्यात यावी.ऑनलाइन ची लिंक तात्काळ दुरुस्त करावी.गर्मी च्या अनुषंगाने तशी व्यवस्था करावी

या सगळ्या समस्या संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या प्रशिक्षणात आहेत.अमरावती जिल्हात चार ठिकाणी हे प्रशिक्षण सुरु झाले आहे.होलीक्रास व ज्ञानमाता हायस्कृल अमरावती,फातेमा हायस्कृल परतवाडा आणि आर.आर.लाहोटी हायस्कृल मोर्शी येथे जिल्हातील एकूण १७वर्गातुन ७५६ शिक्षक,शिक्षिका हे प्रशिक्षण घेत आहे.प्रशिक्षण स्थळी पाणी,नास्ता,चहा याची सुविधा नाही आहे.

प्रशिक्षण स्थळावर असणार्‍या अडीअडचणी सोडवा

संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षकांचे निवड व वरीष्ट श्रेणीचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.पण डायट मार्फत हे प्रशिक्षण घेतल्या जात आहे.२जून पासून हे प्रशिक्षण सुरू झाले.पण पहील्याच दिवशी शिक्षक प्रशिक्षणार्थांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला.सकाळी लवकर प्रशिक्षण असल्यामुळे काही शिक्षकांना उशिर झाला म्हणुन गैरहजर दाखवले.प्रशिक्षणाच्या ठीकाणी आवश्यक सुविधा नाही.त्या बाबतीतचे निवेदन शिक्षक समितीने राज्य शिक्षण संचालक यांना निवेदन सादर करुन प्रशिक्षणात असणार्‍या ञुटया दुरस्त करण्यात याव्या अशी मागणी केली आहे.



विजय कोंबे,राज्याध्यक्ष

(महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती)


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement