नागरीकांना सुलभ व जलद गतीने पारदर्शक सेवा देण्याचा मानस !
महापालिका आयुक्त अभिनव गोयल
नागरीकांना सुलभ व जलद गतीने पारदर्शक सेवा देण्याचा आपला मानस राहिल, असे प्रतिपादन आज नवनियुक्त महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पत्रकारांशी झालेल्या वार्तालापात केले.
महापालिकेतील प्रकल्पांना, विविध कामांना कशा प्रकारे गती देता येईल, याबाबत प्रयत्न करु. तसेच artificial intelligence च्या मदतीने नागरीकांचा सहभाग कसा वाढेल, प्रशासन जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करु अशी माहिती त्यांनी दिली .
शहरं ही भारताचे भविष्य आहेत, त्यामुळे आपल्या शहरांच्या विकासासाठी पुढील 20 वर्षांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने तसेच आपल्या परिक्षेत्राचा अभ्यास करुन, त्यावर उपाय-योजना केल्या जातील,अशी माहिती देखील त्यांनी दिली.
महापालिकेच्या पाणी पुरवठा योजना, आरोग्य व्यवस्था, शिक्षण यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत केले जाणार असून, मा.मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसीय कृती आराखड्याच्या अनुषंगाने नागरीक हा केंद्र बिंदु ठेवून, त्यांच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करु,अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.