• Total Visitor ( 84916 )

जादूटोणा अघोरी कृती करणाऱ्या हिर्लोक येथील ५ जणांना न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

Raju tapal December 19, 2024 27

जादूटोणा अघोरी कृती करणाऱ्या हिर्लोक येथील ५ जणांना न्यायालयाने दिली पोलीस कोठडी

कुडाळ :-हिर्लोक येथील आंबेडकरवाडी येथे जादूटोणा करणारी अघोरी कृती करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना कुडाळ पोलिसांनी अटक करून कुडाळ येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी सरकार तर्फे सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी बाजू मांडली.

याबाबत घडलेली घटना अशी की, दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी आवळेगाव दुरक्षेत्र येथे मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार मौजे हिर्लोक आंबेडकरवाडी येथील विशाल विजय जाधव नामक इसमाचे राहते घरात काहीतरी संशयास्पद हालचाली असून घरात कोणतीतरी जादूटोणा करणारी अघोरी कृती चालल्याचा दाट संशय आहे. अशी माहीती मिळाल्याने पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी हिर्लोक आंबेडकरवाडी येथे विशाल विजय जाधव याचे राहते घरात जाऊन खातरजमा केली असता घरात सुमारे ४ बाय ४ बाय ८ लांबी-रुंदी व खोलीचा खड्डा खोदून अनिष्ट प्रथेचा वापर करुन जादूटोणा करणारे साहीत्य लिंबू, पान सुपारीचे विडे, हळद, पिंजर, नारळ, फळे, फुले, तिळ, बर्फीचे पुडे, पणत्या, अबीर, डमरु, रुद्राक्ष माळ, चांबडयाचे छोट चप्पल जोड, पांढरे कापड, गांधी टोप्या, बाजूला छोटया काठ्या, कांबळी घोंगडयाचे तुकडे, कवडे, बिब्बे अशा साहीत्याची मांडणी करुन नरबळी अगर अन्य कोणत्या तरी अघोरी कृतीकरीता कोयता व सुरी अशी हत्यारे मांडणी केलेल्या स्थितीत दिसून आली म्हणून त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांना सदर हकीगत कळवली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस उपनिरीक्षक श्री. प्रमोद वाघाटे, पोलीस हवालदार कृष्णा केसरकर, प्रितम कदम, अनिल पाटील, महीला पोलीस ज्योती रायशिरोडकर असे सदर ठिकाणी जाऊन वस्तूस्थितीची खात्री केली व घरात उपस्थीत असलेले आरोपीत विशाल विजय जाधव (वय ३०), रा. घर नं. ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोबीबाळी, ठाणे (पश्चिम), सुमित मिलींद गमरे (वय ३३) रा. मु.पो. पातेपिलवली, धर्मवीर नगर, साईनिवास सोसायटी, बि.नं. 9, रु.नं. 709, ता. चिपळूण जि. रत्नागिरी, सौ. हर्षाली विशाल जाधव पुर्वाश्रमीची समृध्दी अविनाश हडकर, (वय ३५) रा. घर नं. ३५३, हिर्लोक आंबेडकरवाडी ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग, सद्या रा. रु.नं. १, काजोळकर हाऊस, राजश्री प्लाम्सचे बाजूला धोवीवाळी, ठाणे (पश्चिम), अविनाश मुकुंद संते (वय ३२) रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे, व दिनेश बालाराम पाटील (वय ३४) रा. उसरघरगांव, मानपाडा, दिवारोड, डोंबिवली (पुर्व), जि. ठाणे हे मिळून आले त्यांचेकडे एवढा मोठा खड्डा खोदण्याचे कारण विचारता आरोपीत विशाल विजय जाधव याचे घरास गृहदोष असल्याने तसेच त्याचे पत्नीस आरोपी हर्षाली जाधव हीस मुलबाळ होत नसल्याने त्यांची पिडा दूर करण्यासाठी सदरची अघोरी पूजा केल्याचे सांगितलेले आहे. परंतू ते समाधानकारक माहीती देत नाहीत. गुन्हयाचे सखोल अन्वेषणाकरीता नमुद सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून आरोपींनी घटनास्थळी येण्या जाण्याकरीता वापरलेली इको कार (एमएच – ०५- इव्ही – ६५६१) ही जप्त करण्यात आलेली आहे. पोलीस हवालदार मंगेश जाधव यांनी सदरबाबत फिर्याद दिलेली आहे. अधिक तपास स्वतः पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.दरम्यान या पाचही जणांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी सरकार तर्फे सरकारी वकील हृदयनाथ चव्हाण यांनी काम पाहिले.
 

Share This

titwala-news

Advertisement