जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे इंदापूर तालुक्यातील सणसर येथे हरिनामाच्या जयघोषात सणसर ग्रामपंचायतीचे सरपंच ऍड. रणजीत निंबाळकर , ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रशासन, वारकरी, ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेत हरिनामाच्या जयघोषात,टाळमृदंगाच्या गजरात उत्साहात स्वागत केले.
यावर्षी ग्रामस्थांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी ग्रामस्थांनी खांद्यावर घेत हरिनामाच्या गजरात एसटी स्टँड पासून प्रथमच नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य पालखीतळाकडे नेली.
भवानीनगर येथे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी रथाचे व दिंड्यांचे स्वागत केले. दरम्यान विद्यार्थ्यांच्या समवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. भरणे यांनी यावेळी पालखी रथाचे सारथ्य केले.
सणसर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पालखीतळामुळे सणसर गावासह वाड्या-वस्त्यां वरून येणाऱ्या भाविकांना कमी वेळेत रांगेत दर्शन घेता आले. यावेळी महिलांची व पुरुषांची वेगळी रांग करण्यात आली होती.
पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलवाडी येथील श्री सद्गुरू स्वामी समर्थ प्रासादिक दिंडी स्वर्गीय हभप बबन कोंडीबा गवारे यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आलेली असून ही दिंडी संत तुकाराम महाराज दिंडी सोहळ्यात श्री क्षेत्र देहू येथून सहभागी झाली.
या पालखी सोहळ्यात दिंडी चालक
ह भ प समीर हिरामण गवारे ,रामदास बाबुराव गवारे ,मारुती धोंडीबा गवारे,प्रकाश जयवंत शिंदे, कांतीलाल शंकर गवारे हे दिंडी चालक असून ह भ प सोपान काका गणपतराव गवारे लक्ष्मण कोंडीबा गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडी सोहळ्याचे नियोजन आयोजन करण्यात आलेले आहे. चोपदार हिरामण गवारे, अण्णासाहेब गवारे, प्रवीण गवारे, विणेकरी ह भ प अण्णा ठोंबे तर तुळशी वाले शालनताई मारुती गवारे व विमलताई लक्ष्मण गवारे आणि मृदुंगमनी सुभाष गवारे विलास गवारे तर गायनाचार्य स्वामी महाराज हे काम पाहत आहेत. सणसर येथील दिंडी सोहळ्यात उद्योजक संतोषशेठ गवारे, विठ्ठलवाडी येथील कलाशिक्षक प्रवीणकुमार जगताप व संभाजी नायकोडी हे पालखी सोहळ्यात सहभागी झाले .कलाशिक्षक प्रविणकुमार जगताप यांनी दिंडीसोहळ्यातील वारकरी भाविकांची अन्नदानाची ,भोजनाची व्यवस्था केली.