जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन
रक्तदान संकलन प्रतिज्ञा सोहळ्यात ७५ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींचे रक्तदान
केमिस्ट हृदयसम्राट, सेवापुरूष अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष, माजी विधान परिषद आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांचा ७५ वा अमृतमहोत्सवी वाढदिवस संपूर्ण देशभर मोठया प्रमाणात साजरा होत आहे. त्यानिमित्त संपूर्ण देशभरात २४ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या रक्तदान संकलन आणि प्रतिज्ञा सोहळ्यात तब्बल ७५ हजारांपेक्षा अधिक रक्तदात्यांनी सक्रीय सहभाग नोंदवून आप्पांना ७५ व्या वाढदिवसाची गोड भेट दिली.
त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त देशव्यापी महारक्तदान शिबीराला कल्याण केमिस्ट ॲण्ड ड्रगीस्ट चे अध्यक्षसागर कुलकर्णी यांच्या अध्यक्षते खाली टिटवाळा शहरातून देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
श्री महागणपती हॅास्पिटल टिटवाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्यांनी आपले योगदान दिले यात महिला रक्तदात्यांचा मोठा सहभाग दिसुन आला.
यासातजी विशेष आभार विक्रांत बापट सर व त्यांची संपुर्ण महागणपती हॅास्पिटल ची टिम यांचे त्यांनी वेळात वेळ काढून हे शिबीर यशस्वी करुण दाखविले. तसेच
सर्व रक्तदात्यांचे देखील आभार मानण्यात आले.