• Total Visitor ( 84983 )

जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या

Raju Tapal March 06, 2023 126

जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या वैज्ञानिकाची हत्या

मॉस्को - स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या रशियन वैज्ञानिकांच्या चमूतील एका वैज्ञानिकाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपुर्ण जगात खळबळ उडाली आहे.

जगभरात २०१९ मध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला. यानंतर कोरोना महामारीमुळे २०२० मध्ये संपूर्ण जगात लॉकडाऊन लागला. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरना व्हायरसवर नेमकं कोणत औषध सापडल नव्हत. त्यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस विकसीत करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक दिवस रात्र एक करु लागले. अखेरीस  रशियातील  वैज्ञानिकांच्या चमूला कोरोनाची लस बनवण्यात यश आले. यात हत्या झालेल्या वैज्ञानिकाचा समावेश होता. आंद्रे बोटीकोव्ह (वय 47 वर्षे) असे या मृत  वैज्ञानिकाचे नाव आहे. आंद्रे बोटीकोव्ह हे एक रशियन वैज्ञानिक आहेत. स्पुतनिक V ही जगातील पहिली कोरोनाची लस बनवणाऱ्या रशिया  वैज्ञानिकांच्या टीममध्ये त्यांचा सहभाग होता. राहत्या घरीच आंद्रे बोटीकोव्ह यांची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे.

परिचाच्या व्यक्तीनेच आंद्रे बोटीकोव्ह यांची हत्या केली आहे. या प्रकरणी 29 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमधील अपार्टमेंटमध्ये आंद्रे बोटीकोव्ह राहत होते. राहत्या अपार्टमेंटमध्येच  आंद्रे बोटीकोव्ह यांचा मृतदेह आढळून आला होता.  आंद्रे बोटीकोव्ह याची बेल्टने गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर काही तासांतच पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. पोलिस तपासात आरोपी दोषी आढळला. यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी त्याने कोर्टात देखील आपला गुन्हा कबूल केला.  मॉस्कोच्या खोरोशेवो जिल्हा न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रशियन वृत्तसंस्थेने याबबतचे वृत्त दिले आहे. याप्रकरणी मॉस्को पोलिसांनी एक निवेदन जारी केले आहे. आंद्रे बोटीकोव्ह हत्या प्रकरणी 29 वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याने हत्येची कबुली दिली असल्याची माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीवर यापूर्वीसुद्धा हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती या निवेदनात देण्यात आली आहे.

Share This

titwala-news

Advertisement