जेष्ठ साहित्यिक डॉ.अनिल अवचट यांचे निधन
जेष्ठ साहित्यिक डॉ.अनिल अवचट यांचे आज गुरूवार दि.२७/१/२०२२ रोजी सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील राहात्या घरी निधन झाले.
ते ७७ वर्षांचे होते.
त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ.अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली.
त्यांच्या पश्चात विवाहीत मुली मुक्ता आणि यशोदा, मोठा मित्रपरिवार आहे.
पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे डॉ.अनिल अवचट यांचा जन्म झाला होता. त्यांनी बी जे मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस ची पदवी घेतली होती.
ते स्वत: पत्रकार होते. पत्रकारितेतील व्यावसायिकतेला त्यांनी नेहमीच नकार दिला. गरिबी, अन्याय, भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असाह्य जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी पत्रकारिता केली.
१९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुर्णिया पुस्तक प्रसिद्ध केले. आतापर्यंत त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा गतवर्षी २०२१ चा महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.
अमेरिका, अक्षरांशी गप्पा, आप्त, कार्यमग्न, कार्यरत, कुतूहलापोटी, कोंडमारा गर्द, छंदाविषयी, छेद, जगण्यातले काही, जिवाभावाचे, व्यक्तीचित्रे, दिसले ते धागे, आडवे उभे, धार्मिक पीपल, माणसं पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर, पुण्याची अपुर्वाई, माझी चित्तरकथा, मस्त मस्त उतार काव्यसंग्रह , मजेदार ओरिगामी, माणसं, वेध, शिकविले ज्यांनी, संभ्रम, सरल तरल, सुनंदाला आठवताना, स्वत: विषयी, सृष्टी दृष्टी, वनात - जनात ,हमीद, हवेसे या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.