• Total Visitor ( 133997 )

जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय पठ्ठे बापुराव पुरस्कार जाहीर

Raju Tapal December 20, 2021 57

जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय पठ्ठे बापुराव पुरस्कार जाहीर 

कै.पठ्ठे बापूराव प्रतिष्ठाण व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा पठ्ठे बापुराव पुरस्कार जेष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डी.भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना तर साहित्यिक बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार गझलकर ,शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी पत्रकारांना दिली. पठ्ठे बापुराव पुरस्कार २१ हजार रूपये,भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रूपये, बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रूपये , स्मृतीचिन्ह,शाल ,श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे २३ वर्ष असून लोककला क्षेत्रासाठी उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीमत्वास हे पुरस्कार दिले जातात. अशी माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष देविदास पाटील, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, महोत्सव समितीचे अध्यक्ष मित्रावरून झांबरे यांनी पत्रकारांना दिली. बुधवार दि.२२/१२/२०२१ रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत पुणे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. शाहीर अमर पुणेकर, जय अंबिका कला केंद्र सणसवाडी ता.शिरूर, कविता बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट, घुंगराचा छनछनाट ,आर्यभूषण थिएटर पुणे येथील लोककलावंत आपली कला यावेळी सादर करणार आहेत. बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली असून लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामुल्य उपलब्ध करून दिलेला आहे.

Share This

titwala-news

Advertisement