जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न !
जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थापक श्री निलेशजी सांबरे यांच्या वतीने मोरोशी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात ब्लड प्रेशर, डायबिटीस,ह्रदय ई ही जी, तज्ञ डॉक्टर सल्ला, मोफत औषधे वाटप आसे उपक्रम संपन्न झाले. या
मोरोशी येथील आदिवासी विभागातील सर्व आजारांचे मोफत निवारण करण्यासाठी जिजाऊ संस्था वेळोवेळी पुढाकार घेत असते. तेरणा स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर लोखंडे, अजित निळे,रवी कदम तसेच त्यांची सर्व टीम हजर होती.जयाताई वाख, (पं.स.सदस्य )श्री प्रकाश पवार सर, वामन मेंगाळ, दिनेश धलपे ,संजय घुटे,संजय शेलवळे, स्वप्निल मुरेकर, चंदर भला, रामचंद्र भला, लाड्या मेंगाल, पांडुरंग मेंगाळ,राजेश देशमुख, सज्जन जमदरे(जिजाऊ संस्था तालुका अध्यक्ष), रवींद्र वाघ मोरोशी शाखा अध्यक्ष, मोहन वाघ सचिव, पद्माकर मेंगाळ खजिनदार , मोरोशी, सुदाम भला फांगुळगव्हाण शाखा अध्यक्ष, दिनेश रोंगटे भोईरवाडी शाखाध्यक्ष, रुपेश मेंगाळ, संतोष पारधी, पत्रकार दिपक चिडा,बाळा भांगे,किरण कारभळ,माधुरी रोंगटे व इतर मान्यवर उपस्थित होते.या आरोग्य शिबिरा अंतर्गत 210 लोकांना विविध आजारांवर उपचार मिळाले,तर 23 रुग्णांना तेरणा हाॅस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जिजाऊ संस्था पुढाकार घेणार असल्याचे सज्जन जमदरे यांनी म्हटले आहे.