जिल्हा परिषद शाळांमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वयांचे वाटप
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुरबाड तालुक्यातील सावर्णॅ,थितबी, निरगुडपाडा साखरवाडी, फांगुळगव्हाण, मोरोशी, दिवाणपाडा, मोरोशी पाडा, उडाळडोह व आवळ्याची वाडी अशा दहा शाळांना, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत 265 विद्यार्थ्यांना 1060 वह्याचे जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यात आला.सदर या वहया वाटप कार्यक्रमासाठी जिजाऊ तालुका प्रमुख श्री सज्जन जमदरे तसेच जिजाऊ स्वयंसेवक श्री संजय घुटे जिजाऊ शाखा पदाधिकारी / फांगुळगव्हान जिजाऊ शाखा सचिव श्री किरण कारभळ तसेच जिजाऊ स्वयंसेवक श्री लक्ष्मण वाघ तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष / सदस्य / ग्रामस्थ / महिला वर्ग यांच्या उपस्थितीत संपन्ना झाला.