जीवनदीप महाविद्यालयात रजत डंगारे या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय खेळाडूच्या हस्ते ध्वजारोहण
प्रजासत्ताक दिनी NSS विभाग, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रमदान करत बांधला वनराई बंधारा.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन हा सर्वच शाळा, कॉलेज, कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करतात. अशाच रीतीने जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रथम देशभक्तीपर गीत, परेड यांचा मेळ घालत कार्यक्रम सुरू करण्यात आला; निर्मल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्तम रीतीने परेड सादर केली त्यानंतर ध्वजारोहणासाठी आमंत्रित केलेल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी ज्याने क्रीडा विश्वात राष्ट्रीय स्तरावर स्वतःच आणि महाविद्यालयाचे नावं मोठं केलं आहे असा श्री रजत डंगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या कार्यक्रमाला (R S P कमांडर ठाणे जिल्हा) मणिलाल शिंपी, महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक ज्यांची (R S P ऑफिसर) म्हणून नियुक्ती झाली असे प्रा.दत्तात्रय सोनवणे, (सामाजिक कार्यकर्ते) अशोक भोईर, जीवनदीप संस्थेचे संचालक. प्रशांत घोडविंदे, प्राचार्य डॉ. के. बी .कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, जीवनदीप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहने, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या निर्मला मेहेत्रे,निर्मळ इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्रा भावना कुंभार, व इतर प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भाषणे व देशभक्तीपर गीते सादर केली. आपले मूलभूत अधिकार याची जाणीव सर्वांना व्हावी याकरता जीवनदीप विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक पथनाट्य सादर केलं व जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मणिलाल शिंपी (R S P कमांडर ठाणे)यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ट्रॅफिकचे नियम पाळणे का गरजेचे आहे हे समजावून सांगितले व अहिरणी बोलीतील एक गीत सादर केले. वक्त्यांची भाषणे पूर्ण झाल्यानंतर हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न करून महाविद्यालयाचा NSS विभाग, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी श्रमदान करण्यासाठी सहभाग घेतला. प्रमुख अतिथी मणिलाल शिंपी ,दत्तात्रय सोनवणे, प्राचार्य डॉ.के
बी .कोरे, प्राचार्य. प्रकाश रोहने, उपप्राचार्य .हरेंद्र सोष्टे, प्रशांत घोडविंदे यांनीदेखील श्रमदानात सहभाग नोंदवून श्रमदान केले. प्राध्यापक विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागाने वनराई बंधारा बांधण्याचे काम यशस्वीरित्या पार पडले. अशा रीतीने प्रजासत्ताक दिन, वनराई बंधारा बांधण्यासाठी श्रमदान हे दोन्ही कार्यक्रम सर्वांच्या एकत्रित सहभागाने यशस्वीरित्या पार पडले.