• Total Visitor ( 84494 )

जीवघेणा रस्ता न बनविल्यास अंदोलन,आपटी बंधाऱ्याचे पाणी पेटणार?तहसिलदारांचे दुर्लक्ष!

Raju Tapal January 20, 2022 33

जीवघेणा रस्ता न बनविल्यास अंदोलन,आपटी बंधाऱ्याचे पाणी पेटणार?तहसिलदारांचे दुर्लक्ष!

एमआयडीसी, शहरे, आणि पाच ते दहा ग्रामपंचायतींना जोडणारा कमी खर्चिक आपटी बंधारा येथील पर्यायी जीवघेणा रस्ता ताबडतोब न बनविल्यास जांभूळ एमआयडीसी येथील पाणी कशी उचलते तेच बघू अशा इशाराच वसत आपटी गावातील ग्रामस्थांनी दिला असून यामुळे येथील पाणी पेटणार आहे, तर गेल्या दोन तीन दिवसापासून यासंदर्भात येणाऱ्या बातम्या ची दखल घेऊन कल्याण सीआयडी विभाचे वरीष्ठ अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.परंतु इतका संवेदनशील विषय असताना, कल्याण तहसीलदार जयराम देशमुख यांनी मात्र याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे, असे वाटते, याबाबत झेडपी सदस्यांचा त्यांनी फोन ही उचलला नाही, यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर आपटी हे गाव वसलेले आहे. या गावाच्या बाजूला, मांजर्ली, बाधण्याचा पाडा,दहागाव, कुंभारपाडा, वाहोली, वाहोली पाडा,अनेक आदिवासी वाड्या वसत्या वसलेल्या आहेत. तर पलिकडे वसत, एरजांड,जांभूळ, सोनिवली,आनंद नगर एमआयडीसी, बदलापूर, अंबरनाथ, आदी छोटी मोठी शहरे आहेत.त्यामुळे कमी पगाराची का असेना नोकरी मिळते, तसेच २०/२५किमी अंतर वाचते यामुळे या गावातील, तरुण, दुधवाले,वयोवृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले हे बंधाऱ्या खालील बनविलेल्या दिड फुटांच्या रस्त्यावरुन जात होते. परंतु मागील वर्षी उल्हास नदीस आलेल्या प्रंचड पुराच्या तडाख्यात या रस्त्याचा काही भाग वाहून गेला,त्यामुळे यावर लोंखडी अँगल टाकले आहे,

नाविलाजास्तव येथील ग्रामस्थ या अँगलवरुन जीवघेणा प्रवास करतात, पावसाळ्यात हा भाग बुडतो,पण उर्वरित ७/८महिने या रस्त्याचा वापर होतो. त्यामुळे तो दुरुस्ती करावा ऐवढी च माफक अपेक्षा या नांगरीकांची आहे, या बाबतीत पत्रकारांनी आवाज उठविल्यानंतर या भागाच्या झेडपी सदस्यां जयश्री सासे यांनी कल्याण पंचायत समितीचे शाखा अभियता गगे, ग्रामसेवक, नितीन चव्हाण, वसतचे सरपंच मधू राणे,आपटीचे सदस्य करुणा भेरले,महेंद्र म्हसकर, मा उपसरपंच, पोलीस पाटील शत्रु शिसवे,आदींनी पाहणी केली, ग्रामस्थांची गरज आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून झेडपी सदस्यां कल्याण तहसीलदार जयराम देशमुख यांना संपर्क साधला, परंतु त्यांच्या कडून प्रतिसाद मिळाला नाही, तर दुसरीकडे या बाबतीत आलेल्या बातम्या ची दखल घेऊन कल्याण सीआयडी विभागाच्या ऐसीपी अनुजा बोराडे,वरीष्ठ पोलीस निरीक्षक, विनायक गोले,पिआय,साबळे,आणि त्यांचे इतर सहकारी यांनी प्रत्यक्षात पाहणी केली व शासनास रिपोर्ट करतो असे ग्रामस्थांना सांगितले. तर मगरुर एमआयडीसी चे अधिकारी, व तहसीलदार यांना आमच्या इतक्या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नसेल तर आमचे हक्काचे, येथून ते पाणी कसे उचलतात तेच आम्ही बघतो,यासाठी मोठे अंदोलन करण्याची वेळ आली तरी आता आम्ही माघार घेणार नाही असा इशारा वसतचे सरपंच मधू राणे यांनी दिला आहे.

तर या रस्त्याच्या प्रश्नाविषयी आपटीगाव चे विनोद शिसवे,राजेश शिसवे,गणेश शिसवे,ऋतिक शिसवे,जयेश शिसवे,रामचंद्र म्हसकर, चेतन शिसवे,सुरज भेरले,रुपेश शिसवे,शाम शिसवे,पंकज भेरले,वंसत शिसवे,आदी तरुण मंडळी व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भविष्यात आपटी बंधारा येथील पाणी पेटणार ऐवढे नक्की?

Share This

titwala-news

Advertisement