नडगाव येथे महापुरुषांचा संयुक्तिक जयंती महोत्सव साजरा
खडवली :- छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्तिक जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन एकता मित्र मंडळ नडगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या नंतर जेष्ठ बौद्धाचार्य रघुनाथ भोईर यांनी बुद्ध पुजेचा कार्यक्रम पार पाडला, यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान एकता मंडळाच्या वतीने करण्यात आला.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भोईर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाला नडगाव दानबाव ग्रामपंचायत सरपंच प्रमिला प्रकाश लोणे, शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, समाजसेवक रमेश लोणे, माजी सरपंच आदेश चौधरी, सतीश चौधरी,रघुनाथ लोणे,गायक शैलेंद्र डावरे, शत्रुघ्न टेकले,अँड संतोष भोईर, सुनील भोईर, जयंती महोत्सव अध्यक्ष रोहीत भोईर, एकता मित्र मंडळ अध्यक्ष विजय भोईर, पत्रकार तानाजी लोणे, मनोज भोईर आदि उपस्थित होते,
उपस्थित पाहुणे यांनी महापुरुषांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी एकता मिंत्र मंडळाचे सदस्य बाळा भोईर, प्रकाश खंडागळे, ज्ञानेश्वर भोईर, विजय भोईर, सुभाष भोईर, सत्यावान भोईर,विशाल भोईर, सचिन भोईर, दिनेश भोईर, सागर भोईर,राहुल गायकवाड, जयेश भोईर, अमूत भोईर, प्रजोत भोईर, संजीवन भोईर, आयुष भोईर,सोनम भोईर, निखिल भोईर, यांनी परिश्रम घेतले,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार विलास भोईर यांनी केले.