• Total Visitor ( 368843 )
News photo

पत्रकार प्रा.डाॅ. दत्तात्रय कारंडे यांचे निधन

Raju tapal December 01, 2025 65

पत्रकार प्रा.डाॅ. दत्तात्रय कारंडे यांचे निधन



 

शिरूर:- दैनिक लोकमत वृत्तपत्राचे न्हावरे (ता‌.शिरूर ) येथील पत्रकार डाॅ.दत्तात्रय मारूती कारंडे यांचे आज पहाटे (दि.१ डिसेंबर) अल्पशा आजाराने वयाच्या ४५ व्या वर्षी निधन झाले. तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात गेली अनेक वर्षे त्यांनी मराठी विषयाचे अध्यापन केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्हावरे‌ येथील श्री‌.मल्लिकार्जून विद्यालयात ते प्राध्यापक म्हणून काम करत होते. मराठी विषयाचे विद्यार्थी प्रिय ,अभ्यासू शिक्षक अशी त्यांची ओळख होती. भीमथडी परिसरातील धनगरी लोकसाहित्याचा लोकतत्वीय अभ्यास या विषयावर प्रा.डाॅ.बाळकृष्ण लळीत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पी एच डी पदवीसाठी प्रबंध लेखन केले होते. वृत्तपत्रीय लेखनातून विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले.सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक विषयांवरही लेखन त्यांनी केले.वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे श्री.मल्लिकार्जून सार्वजनिक वाचनालयाची त्यांनी स्थापना केली. पत्रकार,प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाच्या वृत्ताला शिरूर तालुक्यातील अनेक पत्रकारांनी दुजोरा दिला आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पत्रकार प्रा.डाॅ.दत्तात्रय मारूती कारंडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील शिक्षक,प्रा.नामदेव भोईटे यांनी म्हटले आहे ते शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील अविभाज्य घटक होते.आज पहाटे त्यांचे आजारपणामुळे शिरूर येथील हाॅस्पिटलमध्ये दु:खद निधन झाले.ते एक उत्तम पत्रकार म्हणूनही शिरूर तालुक्यात सर्वत्र सुपरिचित होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने प्रा.पत्रकार दत्तात्रय कारंडे सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना दैनिक सकाळ चे तळेगाव ढमढेरे येथील पत्रकार, निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदीर माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.नागनाथ शिंगाडे यांनी म्हटले आहे,आमचे सहकारी पत्रकार मित्र प्रा.दत्तात्रय कारंडे यांचे निधन अनपेक्षित, वेदनादायी आहे.त्यांच्या चिरंतन आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांची पत्रकारितेतील ओळख,आठवण सांगताना टिटवाळा न्यूज चे पत्रकार श्री.विजय ढमढेरे यांनी सांगितले,पत्रकार डाॅ.प्रा.दत्तात्रय कारंडे न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू अवस्थेत असताना रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या बातम्यांना दैनिक लोकमत मधून प्रसिद्धी देत होते.तसेच मल्लिकार्जून विद्यालयातील शैक्षणिक बातम्यांना दैनिक लोकमत मधून प्रसिद्धी देत होते.पत्रकार,प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांना पत्रकार म्हणून मी श्रद्धांजली अर्पण करत आहे. शिरूर तालुका बालनाट्य परिषदेच्या वतीने बालनाट्य परिषदेचे शिक्रापूर येथील सभासद,पत्रकार राजाराम गायकवाड यांनीही पत्रकार,प्रा.डाॅ.दत्तात्रय कारंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.


Share This

वेबसाइट बनवा — व्यवसाय वाढवा

✨ किंमत फक्त ₹ 999 पासून सुरू!

📞 संपर्क: +91 7208299790 🌐 १ वर्षासाठी डोमेन, होस्टिंग आणि SSL “ मोफ़त ”

titwala-news

Advertisement

Advertisement