सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्याने समाजातील वातावरण बिघडते दिलीपराव वळसे पाटील
पत्रकारांची कार्यशाळा आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे संपन्न
शिरूर:-
सत्यता न पडताळता माहिती प्रसारित केल्याने समाजातील वातावरण बिघडत असल्याने प्रत्येकाने आलेल्या कोणत्याही माहितीची किंवा व्हिडिओची सत्यता पडताळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी मंचर येथे केले.
आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने मंचर येथील जीवन मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या आंबेगाव, खेड,जुन्नर तसेच शिरूर तालुक्यातील पत्रकारांच्या कार्यशाळेत पत्रकारांना मार्गदर्शन करताना वळसे पाटील बोलत होते.
दिलीपराव वळसे पाटील, दैनिक सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे, टी.व्ही.9 मराठी चे संपादक उमेश कुमावत, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, शरदराव पाबळे, डी के वळसे पाटील, सुनील लोणकर, संतोष वळसे पाटील, निलेश कान्नव, कुमार होनराव हे प्रमुख यावेळी उपस्थित होते. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील पुढे बोलताना म्हणाले, दिवसेंदिवस यु ट्यूब चॅनेल, नवीन माध्यमांची संख्या वाढत चालली आहे.खातरजमा न करता त्यांनी बातमी देवू नये असे आवाहन वळसे पाटील यांनी यावेळी केले.
सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक निलेश खरे पत्रकारितेच्या स्वरूपाबद्ल बोलताना यावेळी म्हणाले, पत्रकार म्हणून आपण आपली विश्वासार्हता कमवत असताना इतरांची विश्वासार्हता जपणं,आपली विश्वासार्हता जपणं अतिशय गरजेचे आहे.पत्रकार डावा झाला , पत्रकार उजवा झाला हा सर्वात मोठा धोका आहे सध्याचा पत्रकारितेला .पत्रकारांनी बदलत्या काळानुसार नवतंत्रज्ञान आत्मसात करावे. कोणत्याही एका विचाराला प्राधान्य न देता पत्रकारांनी तटस्थ पत्रकारिता केली तरच पत्रकारितेला भविष्य आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यावेळी बोलताना म्हणाले,पत्रकारांची पेन्शन, पत्रकार भवन , पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.
टीव्ही 9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यावेळी बोलताना म्हणाले, ग्रामीण भागातील पत्रकारांनी जोडव्यवसाय करावा.
उल्लेखनीय क्षेत्रात काम केलेले प्रदीप देसाई,प्रशांत कडूसकर, उदय ढगे,भरत भोर,संदीप एरंडे, निलेश थोरात,दत्ता गांजाळे, पांडुरंग निघोट,अजय घुले,रत्ना गाडे, संजय थ़ोरात यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
पुजा थिगळे यांनी सुत्रसंचलन केले.
आंबेगाव,खेड, जुन्नर तालुक्यासह शिरूर तालुक्यातील संजय बारहाते,सतिश धुमाळ, त्र्यंबक भाकरे, राजाराम गायकवाड, ज्ञानेश्वर मिडगुले , हनुमंत देवकर हे पत्रकार कार्यशाळेस उपस्थित होते.
प्रतिनिधी :- पत्रकार विजय ढमढेरे (कोंढापुरी ता.शिरूर जि.पुणे )