कचरा सफाई करणा-या ट्रकला स्विफ्ट कारची धडक ; कारचालकाचा मृत्यू
Raju tapal
October 09, 2021
35
कचरा सफाई करणा-या ट्रकला स्विफ्ट कारची धडक ; कारचालकाचा मृत्यू
-----------------
पुणे महानगरपालिकेच्या कचरा सफाई करणा-या ट्रकला स्विफ्ट कारने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्विफ्ट कारचालकाचा मृत्यू झाला.
प्रशांत जगन्नाथ भुजबळ वय -३० वर्षे सध्या रा.गांधीनगर येरवडा,पुणे मुळ रा. कोंड ता.जि.उस्मानाबाद असे अपघातात मृत्यू झालेल्या स्विफ्ट कारचालकाचे नाव असून हा अपघात शुक्रवार दि.८ ऑक्टोबरला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील मुंढवा -घोरपडी रस्त्यावरील कचरेवस्ती सुभाष घई बंगल्याजवळ झाला.
पुणे महानगरपालिकेचा कचरा सफाई करणारा एम एच १२ क्यू डब्ल्यू ५२१० या क्रमांकाचा ट्रक सुभाष घई बंगल्यासमोर रस्त्याची सफाई करत पुढे चालला होता. या ट्रकला पाठीमागून आलेल्या एम एच १२ एस एक्स ३१०२ या स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत कारचालक प्रशांत भुजबळ याला गंभीर दुखापत झाली.
गस्तीवर असलेल्या पोलीसांनी त्याला उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल केले.
परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
कचरा ट्रक चालक अमोल कैलास गायकवाड वय ३८ वर्षे रा. दत्तवाडी पुणे हा पुणे महापालिकेची कचरा सफाई ट्रक चालवत होता.
पोलीस उपनिरीक्षक गजानन भोसले पुढील तपास करत आहेत.
Share This