• Total Visitor ( 133252 )

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण. 

Raju tapal November 28, 2024 59

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण. 
    
सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कर देयके मालमत्ताधारकांना वितरीत करण्यात आलेली आहेत. मालमत्ता कराची चालू आर्थिक वर्षाच्या दुस-या सहामाही कराची रक्कम दि.३१ डिसेंबर, २०२४ पुर्वी भरल्यास ४% सवलत व ऑनलाईन २% सवलत देण्याचे यापुर्वी जाहिर केलेले आहे. ज्या नागरीकांनी अद्यापही मालमता कराची रक्कमेचा भरणा केलेला नाही अशा मालमत्ताधारकांना नोटीस बजावण्यात येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून आवाहन करण्यात येत की, नागरीकांनी मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा. कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा- यांवर महानगरपालिका कठोर कारवाईचे पाऊल उचलणार आहेत. यामध्ये, थकीत रक्कमेवर दर महिन्याला २ टक्के रक्कमेची दंडात्मक कारवाई करणे, नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे यासारखी कारवाई करण्यात येईल. या कारवाईनंतर थकीत कराची वसुली न झाल्यास मालमत्तांचा जाहिर लिलाव करुन त्याव्दारे थकीत कराची वसुली करण्याची तरतुद आहे. परंतु, अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तर नागरीकांनी " मुदतीपुर्व मालमत्ता कराचा " भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे.

महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांशी नागरीक हे नोकरदार व व्यावसायिक असल्याने कार्यालयीन वेळेत त्यांना मालमत्ता कराचा भरणा करणेस अधिक सोईचे होणेकरीता दि.१ डिसेंबर २०२४ पासून सर्व शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सर्व नागरी सुविधा केंद्र सुरु ठेवण्यात येत आहेत. 

मालमत्ता कराच्या बिलावरील QR-Code स्कॅन करुन तसेच महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरुन मालमत्ता कराचा ऑनलाईन पध्दतीने भरणा करणेकरीता सुविधा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ घ्यावा व मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मालमत्ता कर विभागाकडून करण्यात येत आहे.

Share This

titwala-news

Advertisement